आमदार सुरेश भोळे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र…

by team

गेल्या 25 वर्षापासून जळगाव शहरातील रस्ते विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. तो सोडवण्यासाठी रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून मुबलक निधी आणणे लोकप्रतिनिधी म्हणून पुरेसा निधी मंजुर करून आणला असतानाही महापालिका प्रशासक आणि पीडब्ल्यूडी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने रस्त्याची कामे सहा महिने होऊनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे याची  अत्यंत गंभीरपणे दखल घेत विकास कामांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तक्रार आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व पीडब्ल्यूडी मंत्री यांच्याकडे केली आहे.दरम्यान तरुण भारतने रविवार, 15 ऑक्टोबर रोजी ‌‘मनपा व पीडब्ल्यूडीचे जमेना, रस्त्यांचा प्रश्न काही सुटेना’ या शीर्षकाखाली महापालिका स्तंभलेख प्रसिध्द केला होता. त्याची दखल घेत आमदार सुरेश भोळे यांनी 16 ऑक्टोबर रोजी थेट मुख्यमंत्र्यांनाच खरमरीत पत्र लिहीले आहे.

मनपा प्रशासन सुविधा देण्यास अपयशी

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार असल्यापासून सुमारे 300 कोटी रुपयांचा भरीव निधी जळगाव शहराच्या विकासासाठी मंजूर करून आणला. नागरिकांकडून वेळोवेळी कर आकारणी करून सुद्धा मनपा प्रशासन नागरिकांना सोई-सुविधा देण्यास अपयशी ठरत आहे.आमदार सुरेश भोळे यांनी शासन स्तरावरून निधी आणून प्रशासनाचे काम सोपे केले. निधी मंजूर होऊन अनेक महिने होऊन सुद्धा प्रशासनामार्फत अद्यापपर्यंत काम सुरु झालेली नाहीत. एवढेच नव्हे तर कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आलेले नाहीत.  त्यामुळे नियोजित विकास कामे  लवकर होत नाही, यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मनपा, पीडब्ल्यूडीत समन्वय नाहीच महानगरपालिका, जळगाव व सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्यामध्ये समन्वय नाही, समन्वय साधून कामे करायला हवी. तो होत नसल्याने रस्त्यांची कामे होत नाही.

कामाचा दर्जा तपासावा

लोकप्रतिनिधींचे काम निधी मंजूर करणे असून आमदार सुरेश भोळे यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे. कामे लवकर पूर्ण करण्यासंदर्भात व कामे चांगल्या दर्जाची होत आहे किंवा नाही, त्याचा दर्जा तपासणे संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना सुद्धा दिल्या. कामाचा दर्जा तपासणे व कामे सुरळीत पणे होण्याची काळजी घेणे ही जबाबदारी अधिकाऱ्यांची असून कामे सुरळीत होत नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना व लोकप्रतिनिधींना होत आहे.मनपा प्रशासकांसह पीडब्ल्युडीच्या  अधिकाऱ्यांना ठरवले दोषी आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेत्या पत्रात महापालिकेच्या प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जळगावचे अभियंता यांना दोषी ठरवले आहे. या दोन्ही विभागाच्या अपयशामुळे विकास कामे सुरू झालेली नाही, अशीही खंत व्यक्त केली आहे.

कठोर कारवाई करा

आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रविंद्र चव्हाण यांना 16 ऑक्टोबर 23 रोजी जा.क्र.10189 ने खरमरीत पत्र लिहीले आहे.  त्यात म्हटले आहे की, राज्यात जनतेच्या मनातील आपले सरकार आल्यापासून जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आपल्या माध्यमातून रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजुर केला आहे. आज सात महिन्याचा कालावधी पूर्ण होऊनसुध्दा एकही कामाची कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. व ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे , त्यांचे कार्यारंभ आदेश निघत नाहीत. यामुळे नागरिकांच्या मनात लोकप्रतिनिधींवर व आपल्या सरकारवर रोष निर्माण होत आहे. निधी मंजुर होऊनही काही अधिकाऱ्यांच्या विशिष्ट हेतूने किंवा वेळ काढूपणामुळे विकास कामे ही फक्त कागदावरच राहतात, ही सत्य परिस्थिती आहे. तरी आपण या प्रकरणी अत्यंत गंभीर पणे लक्ष्ा देऊन विकास कामांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी.असे या पत्रात नमुद केले आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment