जळगावात गांधी जयंतीचा अनोखा उत्सव! विद्यार्थ्यांच्या रॅलीतून अहिंसा, शांतीचा संदेश

---Advertisement---

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत महात्मा गांधींच्या विचारांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. कोर्ट चौक, टॉवर चौक आणि चित्रा चौक मार्गे रॅली महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देत अहिंसा, शांतता आणि सद्भावनेचा जागर केला.

नव्या पिढीपर्यंत गांधी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न

रॅलीच्या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी भारतीय जनता पक्षाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीच्या समारोपावेळी उपस्थितांनी गांधीजींच्या विचारांना अभिवादन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---