---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र, जिल्ह्यातील सात तालुक्यात ६९ गावांना ९० टँकरने पाणीपुरवठा

by team

---Advertisement---

जळगाव: मे हिटचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यातील ७ तालुक्यात ६९ गावांना ९० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गंभीर दुष्काळ जाहिर झालेल्या एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४० पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.

८३ खाजगी तर ७ शासकीय टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. भडगाव तालुक्यातही काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विशेषतः चाळीसगाव तालुक्यात यंदा पर्जन्यवृष्टी न झाल्याने पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठीव टँकर सुरूच होते. अस्तित्वात असलेले पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment