जळगाव नगरीचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम रथोत्सवाचा कार्यक्रम जाहीर,या दिवसा पासून होणार सुरवात

by team

जळगाव:    जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानातर्फे श्री. संत अप्पा महाराज यांनी प्रारंभ केलेल्या कान्हदेशाचे धार्मिक, सांस्कृतीक वैभव असलेल्या व गेल्या 150 वर्षाची परंपरा असलेल्या व कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त श्रीराम रथोत्सव व वहनोत्सवास 14 नोव्हेंबरपासून सुरवात होत आहे. 23 नोव्हेंबरला श्रीराम रथोत्सव होईल.

असे असतील वहन 

कार्तिक शु. प्रतिपदा मंगळवार, 14 नोव्हेंबर घोडा (अश्व) वहनोत्सवास प्रारंभ होईल. 15 नोव्हेंबर रोजी हत्ती (एैरावत), 16 नोव्हेंबर रोजी वाघ, 17 रोजी सिंह, 18 रोजी श्री सरस्वती, 19 रोजी श्री चंद्र, 20 रोजी श्री सुर्यनारायण, 21 रोजी श्री गरुडराज व 22 रोजी श्री मारुतीराय, 23 रोजी श्रीराम रथोत्सव सोहळा,24 नोव्हेंबर रोजी  श्री रासक्रीडा, 25 नोव्हेंबर रोजी श्री तुलसी विवाह सोहळा, 26 नोव्हेंबर रोजी फुलांचा महादेव (हरीहर भेट), 27 नोव्हेंबर रोजी अन्नसंतर्पण सोहळा होईल. भाविकांनी या वहनोत्सवासह रथोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानातर्फे करण्यात आले आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment