अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे.
तेजश्री आणि सुबोध भावे यांची झी मराठीवर लवकरच नवीन मालिका येणार आहे.
या बातमीमुळे चाहते खुश असतानाच तेजश्रीने आणखी एक आनंदवार्ता दिली आहे.
तिचा नवा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
'मुजरा' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले.
मात्र, याचे कथानक काय आहे, यात सहकलाकार कोण आहेत आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही.
तिच्या मालिकेविषयीदेखील वाहिनीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यासाठी थोडा काळ वाट पहावी लागणार आहे.