'वेड' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला.
हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.
या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते.
या चित्रपटाद्वार जिनिलियाने मराठीत पदार्पण केले होते.
आता तिनेच याचा दुसरा भाग येणार, हे सांगितले आहे.
एका मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, 'वेड २' येणार असून त्यावर सध्या काम सुरू आहे.
सध्या मी आणि रितेश आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक कामांमध्ये गुंतलो आहोत. पण वेळ मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करू. 'वेड २' ठरलेलेच आहे.
त्याला थोडा वेळ लागू शकतो. कदाचित एक किंवा दोन वर्षही लागेल. पण, प्रेक्षकांची सतत विचारणा होत असल्याने हा चित्रपट नक्की होणार.