अभिनेत्री तृप्ती डिमरीने पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले.

 तिला चांगल्या चित्रपटांच्याही ऑफर आल्या. आता तिचा 'धडक-२' प्रदर्शित होणार आहे. 

त्यात तिने 'विधी' नामक युवतीची भूमिका साकारली आहे. विधी स्पष्टवक्ता आहे, खरे बोलण्यास घाबरत नाही.

प्रत्यक्षात तृप्तीने म्हटले आहे की, मला माझ्या आयुष्यात विधीसारखे व्हायचे आहे. मी मनातल्या गोष्टी, विचार मनातच ठेवते.

माझ्या वैयक्तिक जीवनात मी खूप सहन केले आणि गप्प राहिली. खरे तर मला असे आवडत नाही.

पण, बोलणे जमत नाही. त्या मानाने माझी नायिका विधी धाडसी आहे.

 तिच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. कारण, ती तुम्हाला सक्षम करते. 

   तृप्तीचा 'धडक-२' येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे