एक गायक आणि गीतकार तरुणी यांची प्रेमकहाणी असणारा 'सैयारा' तरुणाईला विशेष पसंत पडला.

 त्यामुळे चित्रपटाने तिकीटबारीवर चांगलीच मजल मारली. 

अनपेक्षितरीत्या या चित्रपटाने जगभरात ४७८ कोटी रुपये कमावले आहेत.

अहान आणि अनीतच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. असा हा 'सैयारा' येत्या दिवाळीपर्यंत ओटीटीवर येणार असल्याचे वृत्त आहे. 

सध्या हा चित्रपट थियेटरमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. त्यामुळे लगेचच तो ओटीटीवर आणणे निर्मात्यांना परवडणारे नाही.

 दिवाळीपर्यंत तो नेटफ्लिक्सवर पाहता येईल.