जॉन अब्राहमच्या 'फोर्स' या सुपरहिट अ‍ॅक्शनपटाचा तिसरा भाग येतो आहे. 

त्याची तयारीही जोरात सुरू आहे. यावेळी पुन्हा एकदा जॉन एक दमदार कथा घेऊन येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्रीला स्थान देण्यात आले आहे. मीनाक्षी चौधरी असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

थलपती विजचा गोट, महेशबाबूचा गुंटूर करम आणि नानीचा हिट २ यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. 

अनेक नावांच्या छाटणीनंतर जॉन आणि भाव धुलियाने 'फोर्स ३' साठी मीनाक्षीला घेतले आहे.

जॉन प्रमाणेच चित्रपटात मीनाक्षीही अॅक्शन अवतारात दिसणार आहे. 

तशी मीनाक्षीच्या कारकीर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटापासूनच झाली होती. ती हरयाणाची राहणारी आहे. 

 नंतर ती दक्षिणेकडे गेली. अवघ्या चार वर्षात तिने चार तामिळ आणि ११ तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.