सध्याच्या हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी क्रिती आता तिच्या वैयक्तिक जीवनावरून चर्चेत आहे. 

तिचे नाव प्रसिद्ध उद्योजक कबीर बहियासोबत जोडले जात आहे. अनेकदा दोघे एकत्र दिसले तरी त्यांनी नात्याविषयी उघडपणे काहीच सांगितलेले नाही. 

नुकतीच क्रितीने काजोल आणि टिंकल खन्नाच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. 

त्यावेळी तिला टिंकलने विचारले की, तुझा लेटेस्ट क्रश कोण आहे. 

त्यावर क्रिती लाजली आणि म्हणाली, ही अशी व्यक्ती आहे ज्याचा इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. मी एका व्यक्तीला पार्टीत भेटले.

आमच्यासाठी बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. अर्थातच, क्रितीने कबीरचे नाव घेतले नाही. 

मात्र, आपल्या लग्नाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असे आवर्जून सांगितले.