INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी दिल्लीत पोस्टरबाजी, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

---Advertisement---

 

नवी दिल्ली : ८ जून २०२६ रोजी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी राजधानी दिल्ली येथे काही ठिकाणी राहुल गांधी यांना उद्देशून पोस्टर्स लावण्यात आल्याचे आढळेलेले आहे. या पोस्टर्समधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर तसेच इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

हे पोस्टर्स नेमके कोणत्या राजकीय पक्षाने किंवा संघटनेने लावले याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोस्टर्समध्ये शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि पिनाराई विजयन यांच्या कथित वक्तव्यांचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


या पोस्टरबाजीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध करणारे लोक दिशाभूल करणारे आहेत आणि सत्ताधारी पक्ष त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरलेला आहे.


पोस्टर्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. INDIA आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---