जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलीस रक्षकावर हल्ला; कॉलर पकडून बेदम मारहाण, रक्षकाच्या गणवेशाची बटणे तुटली….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा कारागृहात सुनील नन्नवरे या कैद्याने ऑन-ड्यूटी पोलिस रक्षकावर हल्ला केल्याची घटना ८ जून रोजी घडली. बाहेर थांबण्याची वेळ संपल्याने बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या रागातून या कैद्याने रक्षकाची कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पोलिस रक्षकाच्या गणवेशाची बटने तुटली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैद्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील रहिवासी काशिनाथ कारभारी मोटे (वय २६) हे जळगाव जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून कार्यरत आहेत. ८ जून रोजी त्यांची कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मध्ये ड्युटी होती. सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास बंदीवानांची वेळ संपल्याने सर्व कैद्यांना आपापल्या बॅरेकमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. याच वेळी, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी सुनील यशवंत नन्नवरे हा सर्कल क्र. ३ मध्ये रेंगाळताना आढळून आला. यावेळी रक्षक काशिनाथ मोटे यांनी त्याला त्याच्या सर्कल क्र. १ मधील बॅरेक क्र. ३ मध्ये जाण्यास सांगितले.

बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा कैदी सुनील नन्नवरे याला तीव्र राग आला. त्याने रक्षक मोटे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. वाद इतका वाढला की, संतापलेल्या कैद्याने थेट मोटे यांच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्यांना चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु केली. या हल्ल्यात मोटे यांच्या खाकी गणवेशाची दोन बटणे तुटली. या प्रकारानंतर कारागृहात एकच गोंधळ उडाला. तात्काळ या घटनेची माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक यांना देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणून आरोपी कैदी सुनील नन्नवरे याला तातडीने दुसऱ्या विभक्त बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांनी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---