भारतासाठी खुशखबर! जुलैनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार?

---Advertisement---

 

जगभरात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे चिंता व्यक्त केली जात असताना भारतासाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. जागतिक रेटिंग संस्था फिच रेटिंगच्या लेटेस्ट अंदाजानुसार, जुलैनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा थेट फायदा भारतासह अनेक देशांना होण्याचा अंदाज आहे.

सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील अडचणींमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून अनेक देशांना इंधन महागाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, परिस्थिती सुधारल्यास आणि होर्मुज मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्यास तेलाच्या दरात मोठी घसरण होऊ शकते.

Fitch Ratings (Credit Rating Agency) अंदाजानुसार, मे ते जुलैदरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 100 ते 110 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहू शकतात. मात्र ऑगस्टपासून दर कमी होण्यास सुरुवात होऊन ते 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतात. सप्टेंबरमध्ये हेच दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरवाढ उत्पादनातील कमतरतेमुळे नसून पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे झाली आहे. तेल उत्पादन केंद्रे आणि रिफायनरींना मोठे नुकसान झालेले नसल्याने पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर बाजारात तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकतो.

स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा व्यापार या मार्गाने होतो. स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास तेलाच्या किमतींवर दबाव कमी होऊन पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वाढेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---