---Advertisement---
देशातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Paytm ने रोजगाराच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत सुमारे 4,000 पदांची भरती करण्याच्या तयारीत असून, यामागे मर्चंट नेटवर्कचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सेवांना चालना देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
मार्च 2027 पर्यंत भरती प्रक्रिया`
paytm च्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया मार्च 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. गेली मार्च आणि एप्रिल या कालावधीत 800 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंपनीद्वारे करण्यात आली असून आता मोठ्या प्रमाणावर भरती सुरू राहणार आहे.
कोणत्या विभागांत मिळणार संधी?
नवीन भरती प्रामुख्याने खालील विभागांमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे:
प्रोडक्ट डेव्हलपमेंट
टेक्नॉलॉजी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
डिजिटल सर्व्हिसेस
मर्चंट सपोर्ट आणि नेटवर्क
सध्या कंपनीत सुमारे 40,000 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या भरतीनंतर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 10 टक्क्यांनी वाढू शकते.
Paytm ने अलीकडील चार तिमाहींमध्ये नफा नोंदवला आहे. विविध नियामक आणि व्यावसायिक आव्हानांनंतर कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत बदल करत डिजिटल पेमेंट्स, कर्ज, गुंतवणूक आणि इतर वित्तीय सेवांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
Paytmची स्थापना 2010 मध्ये झाली होती. सुरुवातीला मोबाईल रिचार्ज सेवा देणारी Paytm आज डिजिटल पेमेंट्स आणि फिनटेक क्षेत्रातील महत्त्वाचा खेळाडू बनली आहे.









