शिर्डीत एकच खळबळ! प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ; पेढ्यांच्या पॅकेटमध्ये बुरशी, निकृष्ट दर्जाच्या प्रसादाची विक्री?

---Advertisement---

 

साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील काही खासगी प्रसाद विक्री केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचे, कालबाह्य आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून करण्यात येत आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शिर्डीत दररोज हजारो तर वर्षभरात लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. दर्शनानंतर अनेक भाविक प्रसाद म्हणून पेढे आणि मिठाईची खरेदी करतात. मात्र काही प्रसादाच्या पॅकेटवर उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट, उत्पादकाचे नाव किंवा अन्य आवश्यक माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे.

काही भाविकांनी खरेदी केलेल्या पेढ्यांमध्ये बुरशी आढळल्याचा तसेच पेढे कठीण होऊन काळपट झाल्याचा आरोप केला आहे. प्रसाद म्हणून विक्री होत असलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामुळे भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्थानिक नागरिक आणि भाविकांनी अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रसादाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित प्रकारामुळे साईनगरीतील प्रसाद विक्री व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणाबाबत अधिकृत तपास आणि नमुन्यांची चाचणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र सोशल मीडियावर आणि भाविकांमध्ये या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---