---Advertisement---
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे.
प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्नेही उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिल्या.राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा जिल्ह्यात २० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत ३१ ऑक्टोबरच्या आत pragatiabhiyan.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करून सर्व शासकीय विभागांनी अभियानात सहभाग नोंदवावा. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील स्पर्धेचे अर्ज विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात यावेत.