Fill in some text
Fill in some text
मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडेने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.
गौतमीने सोशल मीडियावर स्वानंद आणि तिचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे.
एका सोफ्यावर बसून त्यांनी फोटोशूट केले आहे. हाच फोटो शेअर करत सिक्रेट सांता लवकर आला आहे... आनंद... असं कॅप्शन देत #SwaG #Lafdi असं कॅप्शन दिले आहे
या फोटोवरुन गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे विधी सुरू झाल्याचे वाटत आहे.
फोटोवर तिने #Wedding #Mehendi #GettingMarried कॅप्शन दिले आहे. यावरुन गौतमी आणि स्वानंदचा मेंहदी सोहळा सुरू असल्यासारखे वाटत आहे.
गौतमी आणि स्वानंदच्या या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठी चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांनी गौतमी आणि स्वानंदीला शुभेच्छा दिल्या आहेत. गौतमीने लग्नाची माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
Fill in some text