पीव्ही सिंधू बांधणार '            लग्नगाठ'

 भारताची प्रसिद्ध दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकणार आहे.

पीव्ही सिंधू हिचा होणार नवरा व्यंकट दत्ता साई हा  हैद्राबाद कंपनी Posidex Technologies मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे. 

दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते, मात्र या लग्नाचा निर्णय महिनाभरापूर्वीच घेण्यात आल.  त्यानंतर 22 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. कारण जानेवारीमध्ये पीव्ही सिंधूचे शेड्यूल खूपच व्यस्त असणार आहे. उदयपूर येथील एका भव्य ठिकाणी हा विवाहसोहळा आयोजित केला जाणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे.

22 डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न झाल्यानंतर 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. उदयपूर हे वारसा, शाही संस्कृती, तलाव आणि अरवली टेकड्या आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. या डेस्टिनेशन वेडिंगला बॅडमिंटन आणि इतर क्रीडा जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.