अभिनेत्री शुभांगी अत्रेने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
तिच्या अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
शिल्पा शिंदेनंतर ही भूमिका साकारण्याचं आव्हान असतानाही शुभांगीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
तथापि, तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी शुभांगीने पियुष पुरे यांच्याशी लग्न केलं. मात्र, 19 वर्षांचा दीर्घ संसार संपवून हे दोघं विभक्त झाले.
शुभांगीला एक 18 वर्षांची मुलगी आहे, जी तिच्यासोबत राहते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे मत मांडलं.
घटस्फोटानंतर ती दुसऱ्या लग्नाविषयी विचार करत असल्याचं तिने स्पष्ट केलं.
तिच्या मते, जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य जोडीदार महत्त्वाचा आहे, पण सध्या तिचं पूर्ण लक्ष तिच्या कामावर आणि मुलीवर केंद्रित आहे.
शुभांगीचं हे वक्तव्य तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं असून, तिच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.