अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. 

अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगितले की,

ती १९ वर्षांची असताना एक चित्रपट साईन केला होता. 

पण दिग्दर्शकाने तिला खूप लहान कपडे घालण्याची मागणी केली.

नकार दिला असता दिग्दर्शकाने तिच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिने चित्रपट सोडला.

प्रियांकाच्या मते, दिग्दर्शकाने स्टायलिस्टला सांगितले होते की, जर तिने अंगप्रदर्शन केले तरच प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात येतील.

दिग्दर्शकाच्या वागण्याने खचले आणि महिलांबद्दल असा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत काम न करण्याचे ठरविल्याचे तिने सांगितले.