टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या आकड्यांमध्ये तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर चांगलीच घसरण दिसत आहे.

मालिकेचे निर्माते आणि वाहिनीसाठीदेखील ही बाब चिंताजनक ठरली आहे.

१८ ते २४ जानेवारीदरम्यानचा टीआरपी अहवाल नुकताच समोर आला. यात धक्कादायक फेरबदल पाहायला मिळाले. 

टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असणारी मालिका 'प्रेमाची गोष्ट' पाचव्या स्थानावर घसरली आहे. 

 कायमच चांगले टीआरपी रेटिंग मिळालेल्या या मालिकेला तेजश्रीच्या जाण्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

 आता यावर वाहिनीतील अधिकारी काय उपाय करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.