रणवीरसिंह आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असणारा 'सिम्बा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच गाजला.

याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. 

सिम्बाच्या यशानंतर पुन्हा ही जोडी रूपेरी पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे ही चर्चा जोरात आहे.

रोहितने समाज माध्यमांवर एक व्हिडीओ शेअर करीत आपल्या आगामी प्रकल्पाची घोषणा केली आहे. 

त्यात रणवीर-सारा ही जोडी झळकणार असल्याचेही संकेत रोहितने दिले आहेत. 

हा चित्रपट २०२५ मधील सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर असेल,

 असा दावाही रोहित शेट्टीने केला आहे. त्याने चित्रपटाचे नाव मात्र जाहीर केलेले नाही.