पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'छावा' चित्रपटाची स्तुती केल्यानंतर अभिमानास्पद वाटत असल्याची प्रतिक्रिया अभिनेता विकी कौशलने दिली.

महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर नेले आहे, असे शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी म्हणाले. 

सध्या छावा चित्रपटाने धूम ठोकली आहे, असे मोदी म्हणाले. मागील आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून जागतिक स्तरावर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी छावा चित्रपटाची स्तुती केल्यानंतर अभिनेता विकी कौशलने इंस्टाग्रामवर 'शब्दांपलीकडचा सन्मान' अशी पोस्ट केली, 

तसेच येसूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मदान्ना हिने देखील इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. 

 यात तिने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत ही सन्मानाची गोष्ट आहे, असे लिहिले.