आजही लोकांना ते लक्षात आहेत. आता याचा सिक्वल येणार आहे. त्यात कार्तिक आर्यन असणार हे निश्चित झाले होते.
मात्र, परेश रावल यांनी कार्तिक या प्रोजेक्टमध्ये नसल्याचे सांगितले आहे. आधीच्या कथानकानुसार राजू कार्तिकला कुठून तरी पकडून आणतो, असे ठरले होते.
मात्र, आता कथानक बदलले असल्याने कार्तिक यात नाही. परेश रावल यांनी दुसऱ्या भागावरही नाराजी व्यक्त केली.
मी दिग्दर्शकाला म्हटले होते की, जितके कलाकार वाढवाल, तितका सिनेमा किचकट होतो.
सिनेमा साधा सरळ हवा म्हणजे तो प्रेक्षकांच्या मनात शिरतो. तसा पहिला भाग होता. आता तिसऱ्या भागात ही दक्षता घ्यायला हवी, असेही परेश रावल म्हणाले.