अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. 

सेलिब्रिटी कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली होती.

राजस्थानमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. 

नुकताच त्यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियाराने गोड बातमी दिली आहे. 

 सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली.

 कियाराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे ज्यात त्या दोघांनी दोन छोटे सॉक्स हातात धरले आहेत.

तिने या फोटोला "आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गिफ्ट लवकरच येतंय." असं कॅप्शन दिलं आहे.

 अनेकांनी कमेंट करत सिद्धार्थ आणि कियाराचं अभिनंदन केलं आहे.