अभिनेत्री दीपिका पदुकोण अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलते.

अलिकडेच दीपिकाने सांगितले की, ती नेहमीच तिचे थेरपी सत्र वैयक्तिक ठेवते; जेणेकरून मीडियाने त्याकडे लक्ष देऊ नये.

मी माझ्या कारकीर्दीच्या शिखरावर होते. सर्व व्यवस्थित चालले होते, पण २०१४ मध्ये एका सकाळी काम करीत असताना मी अचानक बेशुद्ध पडले आणि काही दिवसांनी मला जाणवले की, मी नैराश्याने ग्रस्त आहे. 

मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मी मुंबईत एकटीच राहत असे, पण ते कोणासोबतही शेअर करीत नसे. जेव्हा आई मुंबईत आली आणि काही दिवसांनी निघून गेली, तेव्हा मला रडावेसे वाटले.

मला दिवसभर वाईट वाटत होते, जगण्याची इच्छाच हरवून बसली होती.

जेव्हा मी बरी होऊ लागले, तेव्हा मला जाणवले की, लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल लाज आहे.

    यानंतर मी या विषयावर आवाज उठवला. मग मला वाटले की, मी ते आतापर्यंत का दाबले होते.