'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सायली संजीव हिने चित्रपटात काम करायला लागल्यापासून छोटा पडदा जणू स्वतः पासून दूर केला होता.

आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर परत येत आहे. मात्र, सध्यातरी कोणत्याही मालिकेत ती दिसणार नाही.

स्टार प्रवाहच्या आगामी पुरस्कार सोहळ्यात सायली नृत्य सादर करणार आहे. हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रसारित होत आहे.

सोहळा आधीच पार पडला आहे. त्याचे काही प्रोमोही समोर आले आहेत. यात सायली नृत्य करताना दिसत आहे.

तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या निमित्ताने आपण स्टार प्रवाहशी जोडले गेल्याचे सायली सांगते.

तिच्यासोबत या नृत्यात अभिनेता चेतन वडनेरे दिसणार आहे. त्याने 'ठिपक्यांची रांगोळी' मध्ये भूमिका साकारली होती.

    त्यांच्या एकत्र नृत्यामुळे आता त्यांची मालिका येणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.