काही खलनायक इतके समरसून आपली भूमिका करतात की, समोरचा कलाकारही भारावून जातो. प्रसंगी त्या भूमिकेच्या प्रभावामुळे अस्वस्थही होतो. असाच प्रकार अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बाबतीत घडला होता.
एका चित्रपटात तिच्यासोबत खलनायक रणजीतने विनयभंगाचे दृश्य केले होते. हे दृश्य इतके प्रभावी झाले की, त्यानंतर माधुरी ढसाढसा रडली होती.
रणजीत म्हणाले, 'प्रेम प्रतिज्ञा' असे चित्रपटाचे नाव होते. तेव्हा माधुरी नवीन होती. माझी प्रतिमा 'निर्दयी किलर, क्रूर खलनायक' अशी तयार करण्यात आली होती.
त्यामुळे तेव्हा मुलं- मुली मला घाबरायचे. माधुरीने माझ्याबद्दल ऐकले होते आणि त्यामुळे ती घाबरली होती.
आमचा एकत्र विनयभंगाचा सीन होता. वीरू देवगण आमचे फाईट मास्टर होते. एका सीनमध्ये मला तिचा हात पकडून विनयभंग करायचा होता. मी दुसऱ्या शूटिंगसाठी जायचे असल्याने घाईत होतो आणि सेटवर माधुरीची अवस्था काय आहे,
याबद्दल मला कल्पना नव्हती. मला नंतर तिच्याबद्दल समजले. मी तितका वाईट नाही, हे नंतर तिला समजले.