करिना कपूरने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि स्वतःची एक जागा बनवली.
ती शाहिद कपूरची लग्न करणार, असे वाटत असतानाच तिने दोन मुलांचा पिता असणाऱ्या सैफची निवड केली.
प्रत्यक्षात लग्नापूर्वी तिला एक राजकीय नेता आवडायचा आणि तो म्हणजे राहुल गांधी.
करिना सांगते की, मला राहुल गांधी खूप आवडायचे. त्यांचे फोटो मी नेहमीच पाहायची.
मी सिनेसृष्टीतील आणि ते राजकीय घराण्यातील असल्याने दोघांचे संभाषण खूपच मनोरंजक होईल,
असे मला नेहमी वाटायचे. लग्नापूर्वी कोणासोबत फिरायला जायला आवडेल,
असे विचारले असता मी राहुल गांधींचेच नाव नेहमी घेतले.