नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
हा चित्रपट येत्या १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला.
आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. समाज माध्यमावर मॅडॉक फिल्म्सने याबाबत पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहेत.
हा चित्रपट आता १० एप्रिलला नाही तर ९ मे रोजी प्रदर्शि होणार आहे. १० एप्रिलला सनी देओल स्टारर जाट सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.