भोंदू खरातच्या कुकर्मावर चित्रपट येणार; दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका? दीपाली सय्यद पहिली प्रतिक्रिया समोर…!

---Advertisement---

 

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरातच्या आयुष्यावर आता चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अशोक खरातविरोधात अनेक महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासोबतच अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन आपल्या नावावर केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकरणानंतर अशोक खरात सध्या तुरुंगात असून त्याची ईडीकडूनही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

अशोक खरात आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका कोण साकारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या भूमिकेसाठी दीपाली सय्यद यांचे नाव चर्चेत आले.

यावर दीपाली सय्यद प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “भोंदूबाबा अशोक खरातबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली. हा चित्रपट मी तयार करत नाहीये, दुसरे निर्माते तो बनवत आहेत. मात्र कलाकार म्हणून मी त्या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच सर्व काही समोर येईल.” तसेच त्यांनी रुपाली चाकणकर यांच्याबाबत बोलताना, “रुपाली ताईंबरोबर जे काही घडलं असेल, ते अनेक वर्षांपासूनचं आहे आणि त्यांनी ती परिस्थिती हाताळली,” असेही सांगितले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित सत्य आणि त्यामागील राजकीय घडामोडी चित्रपटातून दाखवल्या जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत आणि त्यातील कलाकारांबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---