पुन्हा एका भोंदू बाबाचा फसवा प्रकार! भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची 18 लाखांची फसवणूक; भोंदू आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

गुरुवचन आणि भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने धार्मिक विधी व अघोरी साधनेच्या नावाखाली दोघांना जाळ्यात ओढत त्यांची दोन एकर जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कमलेश भगवान देवकर (रा. तकळखेडा, ता. मालेगाव, जि. नाशिक) आणि त्याची पत्नी गौरी कमलेश देवकर (रा. समर्थनगर, चरण आनंद सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी पीडित दोन भावांना त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू हा “भूतबाधा” आणि “शाप” यामुळे झाल्याचे सांगून मानसिकरीत्या प्रभावाखाली घेतले.

यानंतर विविध पूजा, तंत्र-मंत्र, धार्मिक विधी आणि आश्रमातील कार्यक्रमांच्या नावाखाली आरोपींनी दोन्ही भावांशी सतत संपर्क ठेवला. “तुमच्या कुटुंबावर संकट आहे, देव रागावले आहेत,” अशी भीती दाखवत त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यात आले.

तसेच आरोपींनी पीडितांना नातेवाईक आणि मित्रपरिवारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मोबाईल संपर्क तोडण्यास भाग पाडत आश्रमात बोलावून “विशेष पूजा” आणि “अघोरी साधना” करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर, “तुमची जमीन शापित आहे. ती आमच्या ट्रस्टच्या नावावर केल्यास संकट दूर होईल,” असे सांगत आरोपींनी दोन्ही भावांकडून सुमारे दोन एकर जमीन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. या जमिनीची किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---