रक्षा खडसेंविरोधातील ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपाचा निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणी….

---Advertisement---

 

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या मुक्ताईनगर तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार आणि मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी अश्लील, आक्षेपार्ह आणि मानहानीकारक भाषा वापरण्यात आली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी असून समाजात चुकीचा संदेश देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी असून राज्यातील मोठ्या जनसमुदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना दुखावल्याचा दावा करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपाच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---