सोने-चांदी खरेदी करायचं अशक्यच? सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी; दिवाळीपूर्वीच मोठी खळबळ…..

---Advertisement---

 

दिवाळीचा सण सुरू होण्यापूर्वीच जळगावच्या सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ३ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल १० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर १ लाख ३८ हजार रुपयांवरून वाढून १ लाख ४१ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात सोनं ३ हजार ५०० रुपयांनी महागलं आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली. चांदीचा भाव १ लाख ८० हजार रुपयांवरून थेट १ लाख ९० हजार रुपयांवर गेला आहे. अवघ्या २४ तासांत चांदी १० हजार रुपयांनी महागल्याने सराफा बाजारात मोठी चर्चा सुरू आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर सोने आणि चांदीच्या दरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात सराफा बाजारात दरांची दिशा काय राहणार, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---