Chalisgaon Constituency : चाळीसगाव मतदार संघांत विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे आघाडीवर आहेत. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना उबठा गटाचे उन्मेष पाटील हे लढत देत आहेत.
प्रचाराच्या दरम्यान, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. महायुती व महाविकास हिरीरीने प्रचार केल्यामुळे येथील लढत ही अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कडाडून टिका करतांनाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. भाजपचे मंगेश चव्हाण यांनी आघाडी घेली आहे.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघांची निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे.
सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल. कोणाला बहुमत मिळेल, कोणते गट एकत्र येतील, आणि सत्ता स्थापनेसाठी कोणती रणनीती अवलंबली जाईल, याबाबत राज्यातील जनतेत कमालीची उत्सुकता आहे.