---Advertisement---
मुंबई–आग्रा महामार्गावरील लळींग घाटात सीएनजी गॅस वाहतूक करणारे वाहन उलटल्याने अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जाणारे MH 04 NB 0716 क्रमांकाचे वाहन अचानक उलटले.
अपघाताची माहिती मिळताच टोल पेट्रोलिंगचे पथक आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीएनजी गॅस वाहतूक करणारे वाहन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक तात्पुरती रोखण्यात आली आहे.
सध्या मुंबई–आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
अपघातात जीवितहानी किंवा गॅस गळतीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.









