घरगुती आर्थिक व्यवहारातून वाद विकोपाला; प्रॉपर्टीच्या वादातून भावाच्या शालकाचा चाकू भोसकून खून; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर…!

---Advertisement---

 

घरगुती आर्थिक वाद विकोपाला जाऊन प्रॉपर्टीच्या वादातून भावाच्या शालकाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली असून घटनेने खळबळ उडाली आहे.

हि घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडली आहे. प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यात मृत व्यक्तीचे नाव दीपक प्रकाश कानडे असे असून, आरोपी संतोष हरलाल कानडे हा मृताचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष कानडे आणि दीपक कानडे यांच्यात घराच्या आर्थिक व्यवहार तसेच मालमत्तेच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आणि हाच वाद विकोपाला जाऊन हि घटना घडली आहे.

सोमवारी रात्री उशिरा पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतोष कानडे याने दीपक कानडे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक कानडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर आरोपी संतोष कानडे स्वतःहून पाचोरा पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, मयताच्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात चर्चा सुरू आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---