पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताहा’तर्फे आयोजन; शाहूनगरातील ५ अंगणवाड्यांमध्ये बालकांना खाऊ वाटप, सेविकांचा सन्मान…

---Advertisement---

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध सेवा उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप मंडळ क्रमांक २च्या वतीने जळगावातील शाहूनगर परिसरात सेवा सप्ताहांतर्गत विशेष उपक्रम घेण्यात आला. परिसरातील पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना खाऊ वाटप करण्यात आले, तर अंगणवाडी सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमादरम्यान खासदार स्मिताताई वाघ यांनी अंगणवाडीतील चिमुकल्यांशी आपुलकीने संवाद साधला. बालकांना खाऊचे वाटप करताना त्यांच्या शिक्षण, संगोपन आणि अंगणवाडीतील उपक्रमांचीही माहिती घेण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बालकांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी महापौर सीमाताई भोळे, जळगावच्या महापौर तथा मंडळ क्रमांक २च्या अध्यक्षा दीपमाला काळे, मनपातील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, महिला महानगराध्यक्षा नीतूताई परदेशी, महिला व बालकल्याण समिती सदस्या गायत्री राणे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दीपक परदेशी, सरोज पाठक, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, रेखा वर्मा, चेतना मुळीक, उषा पाठक, राजनंदिनी राणा, अंजली धवसे, सविता पोळ, सविता बोरसे, शोभा खैरे, ललित लोकचंदानी, कांचन महाजन, पायल भापकर, ऋषिकेश शिंपी, नयन सपकाळे आदी उपस्थित होते.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अंगणवाडीतील बालकांसाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात आले. बालकांना खाऊ वाटप आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान या माध्यमातून सामाजिक सहभागाचा संदेश देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---