सलाईन मधून पतीला दिलं विष, विमा रकमेच्या लालसेपोटी प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट; तीन महिन्यांनी माजी सैनिकाचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला…

---Advertisement---

 

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या माजी सैनिकाच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या लालसेपोटी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मृतदेह दफन केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पुन्हा बाहेर काढला आहे.

संदीप मंजरीक (४५) यांचा काही महिन्यांपूर्वी मंदिराच्या जत्रेतून परतत असताना अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती मानला जात होता.

मात्र, मृताच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली. तपासादरम्यान काही नवीन माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

तपासात मृताच्या पत्नीवर पतीच्या विमा रकमेवर डोळा ठेवून कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तिच्या कथित प्रियकराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका सेल्फी व्हिडिओमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओचीही पोलीस तपासणी करत आहेत. पोलीस या प्रकरणातील सर्व पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक निष्कर्षांच्या आधारे तपास पुढे नेत असून, अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---