jalgaon news: चाबी हरवली अन् असं काही घडलं

by team

जळगाव : हरविलेल्या चावीचा दुरुपयोग करत चोरट्यांनी  महावीर नगरात सुंदरम  अपार्टमेंटमध्ये हर्षा प्रमोद कुळकर्णी (52) यांच्या कपाटातून चोरट्याने  सोन्याचे दागिणे, रोकड असा 2 लाख  32 हजार  500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार गुरुवार 19 रोजी घडला. कुळकर्णी या घरी आल्या असता त्यांना कपाटातील साहित्य तसेच सामान अस्तव्यस्त पडल्याचे दिसले. हरविलेल्या चाबीचा दुरुपयोग करत चोरट्यांनी कपाटाचे लॉक उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कपाट बघीतले असता त्यातील दागिने, रोकड चोरट्यांनी नेल्याचे लक्षात आले.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment