जळगाव: महापालिकेतील विविध संवर्गातील तात्पुरत्या स्वरुपातील सहा महिन्यांच्या हंगामी कालावधीसाठी करार पध्दतीने भरण्यात येणाऱ्या 86 जागांसाठी 2,521 अर्ज आज सायंकाळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेत साडेपाच वाजेपर्यंत जमा झालेले आहेत.
यात कनिष्ठ अभियंता बांधकाम विभागात 10 जागांसाठी 341 अर्ज, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा 3 जागांसाठी 100, विद्युत अभियंता 5 पदांसाठी 79, रचना सहायकच्या 4 पदांसाठी 153, आरेखकच्या 2 जागांसाठी 31. अग्निशमन फायरमनच्या 15 जागांसाठी 176, वायरमनच्या 12 जागांसाठी 165, विजतंत्रीच्या 6 जागांसाठी 261, आरोग्य निरिक्ष्ाकच्या 10 पदांसाठी 182 तर टायपिस्ट / संगणक चालकाच्या 20 जागांसाठी 1033 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.