---Advertisement---
जळगाव : राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीत नव्या कामाला सुरुवात झाली. या कामाला वर्ष होण्यापूर्वीच ठिकठिकाणी हायवेवर खड्डे निर्माण झाले. शहरात आयटीआयजवळ खड्ड्यांमुळे महामार्गाला विद्रूप स्वरुप प्राप्त झाले.वारंवार डागडुजी करुनही खड्ड्यांची समस्या ‘जैसे थे’ राहत असल्याने याठिकाणी नवीन केलेल्या डांबरीकरणाचे काम खोदण्यात आले. भराव, खडीकरण, डांबरीकरण पुन्हा नव्याने सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
उड्डाण पूलही नाही खड्डेमुक्त
प्रभात कॉलनी, अग्रवाल हॉस्पिटल या परिसरात उड्डाणपूल निर्माण करण्यात आला. मात्र खड्ड्यांनी या उड्डाण पुलाचाही पिच्छा सोडलेला दिसत नाही. ठिकठिकाणी खड्डे झाल्याचे चित्र दिसते आहे. उड्डाण पुलाची ही समस्या दुर्लक्षित करता येणार नाही. वेळीच याची दखल घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.