---Advertisement---

पोटातून गोळा काढून महिलेचा वाचवला जीव!

by team

---Advertisement---

जळगाव : प्रसूती झालेल्या महिलेला ट्युमर असल्याचे निदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाले. शल्यचिकित्सा विभागाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून मोठा गोळा काढत तिचा जीव वाचविण्यात यश मिळाले.यावल येथील 22 वर्षीय महिला गरोदर होती. त्यांच्या पोटात बाळासह एक मोठी गाठ वाढत असल्याचे खासगी हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आले. महिलेची प्रसृती नॉर्मल झाल्यावरही ही गाठ कमी झाली नव्हती.नातेवाईकांनी या महिलेस शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे शल्यचिकित्सा विभागात डॉ.प्रशांत देवरे यांनी महिलेच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. रुग्णाला मोठ्या आतडीच्या गाठीचे निदान झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठ्या आतडीचे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्र्ाक्रियेसाठी  डॉ.समीर चौधरी, डॉ. ज्ञानोबा होळंबे, डॉ. विपीन खडसे, डॉ. जिया उल हक यांच्यासह भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ.राजेश सुभेदार, विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक शेजवळ, शस्त्रक्रिया गृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी, आयसीयूच्या इन्चार्ज राजश्री आढाळे यांचे उपचारकामी सहकार्य लाभले.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---