---Advertisement---
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जळगाव जनता सहकारी बँकेत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी भावपूर्ण वातावरणात कन्यापूजन सोहळा पार पडला. यानिमित्त शिवाजीनगर परिसरातील कन्या छात्रालयात राहणाऱ्या मुलींना आमंत्रित करून त्यांचे देवीचे रूप मानून पूजन करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत कन्येला देवीचे स्वरूप मानले जाते. याच श्रद्धेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मुलींचा सन्मान करण्यात आला. नवरात्रोत्सवातील भक्तिभाव आणि संस्कारांचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या सोहळ्यास जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालिका डॉ. सौ. आरतीताई हुजुरबाजार यांच्यासह बँकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी कन्यापूजनात सहभागी होत उत्सवाचा आनंद अनुभवला. श्रद्धा, संस्कृती आणि कन्येप्रती आदरभाव जपणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.









