नंदुरबार- डी.आर. हायस्कूलजवळ अपघात; नशेत लक्झरी बस चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा; मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा आरोप…

---Advertisement---

 

नंदुरबार शहरातील डी.आर. हायस्कूल परिसरात घडलेल्या अपघातामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. याबाबत नंदुरबार शहरात मद्यधुंद अवस्थेत लक्झरी बस चालवणाऱ्या चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नंदुरबारच्या डी.आर. हायस्कूल परिसरात लक्झरी बसने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर चालकाची तपासणी करण्यात आली असता तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी रिक्षा चालक अशोक शामराव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मद्यधुंद बस चालक दीपक सुभाष अहिरे याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी दीपक बुनकर करीत आहेत. दरम्यान, वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---