शरीर संबंधासाठी नववधूची टाळाटाळ, लग्नानंतर पत्नी दाढी करताना सापडली, २५ दिवसांनंतर तृतीयपंथी असल्याच उघड? सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा….

---Advertisement---

 

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये लग्नाच्या २५ दिवसांनंतर पत्नी तृतीयपंथी असल्याचा पतीचा दावा असून पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय तपासणीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर येथे लग्नानंतर पत्नी शरीरसंबंधांना टाळाटाळ करत होती, दरम्यान पतीला संशय आला आणि २५ दिवसांनी पत्नी तृतीयपंथी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका ३२ वर्षीय पतीने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून, संबंधित व्यक्ती तृतीयपंथी आहे की नाही, याबाबतचा दावा अद्याप वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शेजाऱ्याच्या मध्यस्थीने राजगड जिल्ह्यातील पचोर येथील एका व्यक्तीशी विवाह ठरला. कुटुंबाला लग्न पुढे करायचे असतानाही वधूपक्षाने घाईचा आग्रह धरला आणि २९ जून रोजी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला. लग्नासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आले तसेच वधूपक्षाला एक लाख रुपये रोख देण्यात आले. असं तक्रारदाराच म्हणणं आहे.

पतीच्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसानंतर शरीरसंबंधांना टाळाटाळ तर कधी मासिक पाळीचे कारण देत आणि त्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत पत्नीने वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. काही दिवसांनी ती माहेरी गेली आणि नंतर परत सासरी आली. कुटुंबातील एका महिलेने संबंधित वधूला दाढी करताना पाहिल्यानंतर संशय निर्माण झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी या संदर्भात जाब विचारल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारदार पतीने असा आरोप केला आहे की, या विषयावर चर्चा करण्यासाठी वधूपक्षाला बोलावण्यात आले असता दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्यावेळी शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी पत्नीच्या कुटुंबातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित व्यक्ती तृतीयपंथी आहे की नाही, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. वैद्यकीय तपासणीनंतरच या दाव्याची सत्यता स्पष्ट होईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी असेही स्पष्ट केले की, तपासात फसवणूक किंवा अन्य गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---