---Advertisement---
रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध गोमास विक्री करणाऱ्यावर अभोडा येथे धाड टाकून सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीचे ६०० किलो गोमास जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आज सकाळी येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक अभोडा येथे गेले असता बस स्टॅन्ड परिसरात एक इसम त्याच्या राहत्या घरात दोन जनावरांची मास विक्री करण्याच्या उद्देशाने कत्तल करून सूरीने मास कापताना मिळून आला .पोलिसांनी उस्मान हुसन कुरेशी राहणार अभोडा यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे तीनशे किलो वजनाचे गोमास व एक कुऱ्हाड जप्त केली .
दुसऱ्या कारवाईत इरफान रहेमान लंगड्या कुरेशी राहणार अभोडा हा गोमास विक्री करताना दिसला. परंतु पोलीस पथक दिसताच तेथून तो पळून गेला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी साठ हजार रुपये किमतीचे तीनशे किलो गोमास कुऱ्हाड व सुरा जप्त केला आहे. तसेच अभोडा येथील आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवलेल्या तीन गाई दिसल्या त्या तीन गाईंची सुटका पोलिसांनी करून त्यांना गोशाळेत रवाना केले आहे .याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण,जगदीश पाटील, समाधान ठाकूर,श्रीकांत चव्हाण,प्रमोद पाटील, विशाल पाटील,राहुल परदेशी,विकार शेख, महिला पोलीस उषा मासाने यांनी कारवाई केली.









