मुंबईत अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दोन अल्पवयीन संशयित ताब्यात

---Advertisement---

 

मुंबईतील माहिम परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर माहिम पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी माहिममधील एका शाळेजवळून 13 वर्षीय मुलीला तिच्या ओळखीच्या 16 वर्षीय मुलाने जबरदस्तीने दुचाकीवर बसवल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे तिचे हात आणि तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत आणखी एक अल्पवयीन मुलगा सहभागी असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.

धमकीमुळे काही काळ पीडित मुलगी मानसिक तणावात होती. अखेर तिने धाडस करून माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

दोन्ही संशयित अल्पवयीन असल्याने या प्रकरणाचा तपास संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसार केला जात आहे. घटनेमागील नेमका प्रकार, इतर कोणाचा सहभाग आहे का आणि धमकी देण्यात आली होती का, याचा पोलीस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---