धक्कादायक! खिचडी देण्यास नकार दिल्याचा राग; सिमेंट काँक्रीटचा मोठ्या दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीचा खून, शाहूनगरात खळबळ

---Advertisement---

 

जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात क्षुल्लक कर्णवरून आलेल्या रागातून एका ४० वर्षीय व्यक्तीची खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाने खाण्यासाठी खिचडी मागितली मात्र आणि खिचडी न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शालिक पाथरकर (वय ४०, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर, सध्या रा. शाहूनगर, जळगाव) हे सोमवारी दुपारी शाहूनगर परिसरातील एका मोकळ्या जागेत होते. त्यावेळी संशयित अंकुश नथ्थू पाटील (वय ४६, रा. समतानगर, जळगाव) तेथे आला. आरोपीने जीवन पाथरकर यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने जवळच पडलेला सिमेंट काँक्रीटचा दगड उचलून जीवन यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जीवन पाथरकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर मयताचे नातेवाईक (भाचा) तुषार राजेंद्र सुतार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या घटनेमुळे शाहूनगर परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---