माळशिरसमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; 1.24 कोटींचे विदेशी मद्य आणि ट्रक जप्त…!

---Advertisement---

 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची मोठी खेप जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे 1 कोटी 24 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी माळोली (ता. माळशिरस) येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचला. तपासादरम्यान एका 14 चाकी ट्रकमधून गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 750 मिली क्षमतेच्या 8,400 विदेशी मद्याच्या बाटल्या (700 बॉक्स) जप्त केल्या. या मद्याची किंमत सुमारे 92.40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 14 चाकी ट्रक (अंदाजे 32 लाख रुपये) आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 1 कोटी 24 लाख 71 हजार रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले करत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सचिन भवड यांच्या नेतृत्वाखाली राकेश पवार, सौरभ भोसले आणि भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---